शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik ED Custody : "तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा..."; ईडी कोठडीच्या शिक्षेनंतर नवाब मलिकांच्या अकाऊंटवरून ट्वीट; शायरीतून विरोधकांना दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:48 IST

दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

Nawab Malik, ED Custody : महाराष्ट्रातील राजकारणात दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी (Enforcement Directorate Custody) देण्याचे आदेश विशेष न्यायालयाने (Special PMLA court) सुनावले. ईडीकडून मलिक यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीचे आदेश देण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित काही लोकांकडून मलिक यांनी कमी दराने कुर्ल्यातील जमिनी विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपा नेत्याकडून करण्यात आला होता. याच संदर्भात ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवाब मलिक हे जरी ईडी कोठडीत असले तरी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास प्रेरणादायी आणि इशारा देणारा एक शेर ट्वीट करण्यात आली आहे.

नवाब मलिक हे जरी ईडी कोठडीत असले तरी दिवसभरात त्यांच्या अकाऊंटवरून त्यांचे जनसंपर्क विभाग (PR) सांभाळणाऱ्यांकडून काही ट्वीट करण्यात आले आहेत. मलिक यांना विशेष न्यायालयाकडून जेव्हा ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर काही वेळातच ही बातमी प्रसारमाध्यमांच्या मार्फत सर्वत्र समजली. त्यानंतर काही वेळातच नवाब मलिक यांच्या अकाऊंटवरून एक शायरी ट्वीट करत भाजपाला इशारा देण्यात आला. 'कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा!!', असं ट्वीट त्यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने आज पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सुमारे ८ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर मलिक यांना ईडीने अटक केली. अटकेनंतर मलिक यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून झाल्यावर विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या सर्व घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसले तसेच काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचेही दिसून आले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस