उपचारासाठी शरद पवार रुग्णालयात
By Admin | Updated: January 24, 2016 22:38 IST2016-01-24T20:26:29+5:302016-01-24T22:38:04+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारासाठी शरद पवार रुग्णालयात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थेमुऴे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी रुबी रुग्णालयाचे संचालक डॉ.परवेज ग्रॅंट यांनी सांगितले की, पवार यांच्या शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना आज सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल. तर, सततच्या दौऱ्यांमुळे थकवा जाणवल्याने तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकूश काकडे यांनी दिली. तसेच त्यांची प्रकृती उत्तम असून उद्या ते मुंबईला जाणार असल्याचेही काकडे म्हणाले.