शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 12:12 IST

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून मृत्युचं तांडव सुरु आहे. मृतांच्या कुटुबियांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही, ते महाबळेश्वरला आरामासाठी गेलेत. ठाण्यात एवढे होऊन सुद्धा मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

त्यांचे जे पोपटलाल आहेत ते घोटाळे काढत बसले आहेत. त्यांनी कळव्यातल्या 18 लोकांबाबत संवेदना सुद्धा काढली नाही. भाजपने प्रश्न विचारला आहे का? लोकप्रतिनिधींचे राज्य नाहीय. जर  लोकप्रतिनिधींचे राज्य असते तर मृत्यूचे राज्य टाळले गेले असते. ठाणे मुंबईमध्ये लोकप्रतिनिधित्व नाही आहे, त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेना शिंदे गट-भाजपवर केली. 

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

परवा ज्या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यावर काल आम्ही, नाना पटोले यांच्यात बैठक झाली. यामध्ये यावर चर्चा झाली. ते त्यांचे पुतणे आहेत, असू शकतात. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे, असा सवाल राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर व्यक्त केला आहे. आम्ही लोकांनी त्यांच्यासोबत बसायचे, नातीगोती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं अशा प्रकारचे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम होईल अशा लोकांच्या मनात भीष्मपितामहामुळे निर्माण होणं हे मान्य नाही . शरद पवार हे महाराष्ट्राचे इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांचा संवादाचा स्वभाव आहे. राज ठाकरेंबरोबर देखील आमचा दोस्ताना होता, पण आमचे मार्ग वेगळे आहेत, लोकांच्या मनात संभ्रम येईल असं नेत्यांनी वागू नये , असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार