शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये मोदींचे तीन ट्विटर हँडल; राहुल, सोनिया गांधी 'अनफॉलो'च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:10 IST

काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळजवळ समान आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र सामोरा गेला. मात्र ट्विटवर पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते दिसत नाहीत.

- मोसीन शेख/रवींद्र देशमुख

मुंबई - इंटरनेटच्या क्रांतीनंतर २०१४ पासून सोशल मीडियाने संपूर्ण देश व्यापून टाकला. त्यामुळे संपर्क आणि इतर गोष्टींच्या कक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुंदवल्या की, प्रचार आणि प्रसाराचं तंत्रच बदलून गेलं. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल साईट्ने सर्वांना व्यापून टाकले. यामुळे एकमेकांना फॉलो करण्याची संकल्पना समोर आली. त्यातून मग आपल्या आदर्श व्यक्तीला किंवा समविचारी लोकांना फॉलो करण्याचा पायंडा पडला. राजकारणात हे मोठ्या प्रमाणात दिसून येते.

राजकीय पुढाऱ्यांना पक्षातील कार्यकर्ते, हितचिंतक, सहकारी फॉलो करत असतात. यामुळे नेत्यांना देखील लाखो कार्यकर्त्यांसोबत एकाचवेळी कनेक्ट राहण्यास मदत होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे सुद्धा आघाडीवर आहेत. पवार यांचे ट्विटरवर लाखो फॉलोवर्स आहेत. परंतु, पवार केवळ १३ लोकांनाच फॉलो करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेले पवार मोदींच्या ट्विटरवरील तीन हँडलला फॉलो करतात. त्याचवेळी शरद पवार यांच्या फॉलो लिस्टमध्ये युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र दिसत नाहीत.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळजवळ समान आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र सामोरा गेला. मात्र ट्विटवर पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये काँग्रेसचे एकमेव नेते दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.पवार यांना करतात फॉलो शरद पवार आपल्या ट्विटर अकाऊंटवर १३ लोकांना फॉलो करतात. यातील चार जण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. यामध्ये मोदींच्या तीन ट्विटर हँडलसह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलेरी क्लिंटन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा समावेश आहे.