शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात’’, उत्तम जानकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:55 IST

Uttam Jankar Criticize Gopichand Padalkar : आज मरकडवाडीच्या दौऱ्यावर गेलेल्या गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात, असा टोला लगावला आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गाव सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेलं आहे. या गावात शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्यापेक्षा भाजपाच्या राम सातपुते यांना अधिक मतं मिळाल्याने उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून इव्हीएमवर शंका घेण्यात आली होती. तसेच मतदानाची शहानिशा करण्यासाठी गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र हे प्रयत्न पोलीस प्रशासनाने उधळून लावले होते. तेव्हापासून येथे नेतेमंडळींची ये जा सुरू आहे. दरम्यान, आज मरकडवाडीच्या दौऱ्यावर गेलेल्या गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात, असा टोला लगावला आहे. 

मरकडवाडीमधील आंदोलन शरद पवार यांनी हायजॅक केलं, असा आरोप  गोपिचंद पडळकर यांनी केला होता. त्याबाबत टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये उत्तम जानकर म्हणाले की, असे बारके चिरके लोक तिथे जाऊन शरद पवार यांच्यावर टीका करणं म्हणजे त्यांच्याबाबत काय बोलणार. अशा उंदरांचा सुळसुळात झालाय. पण अशी पाच उंदरं शरद पवार नाश्त्याला खातात, त्यामुळे अशा पाच उंदरांबाबत तिथे काही फार मोठा फरक पडणार नाही.

यावेळी उत्तम जानकर यांनी पराभूत उमेदवार राम सातपुते यांनाही आव्हान दिले. ते म्हणाले की, राम सातपुते यांच्याकडे आता महिनाभरात आमदार होण्याची संधी आहे. राम सातपुते यांनी माझ्यासोबत निवडणूक आयोगाकडे यावं. इथलं मतदान चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे इथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करावी. म्हणजे राम सातपुते यांना २०२९ वाट बघण्याची आवश्यकता नाही. महिनाभरातच त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळेल. राम सातपुते यांनी केवळ माझ्यासोबत निवडणूक आयोगाकडे यावं, मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे, असं आव्हानही यावेळी उत्तम जानकर यांनी दिलं. 

टॅग्स :malshiras-acमाळशिरसSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकर