शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:32 IST

Shashikant Shinde Political Career: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग रोखून आगामी निवडणुकीत पक्षाला नवी उंची गाठून देण्यात शशिकांत शिंदे यांना यश येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जाते.

Shashikant Shinde Political Career: अखेर शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.

राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. महायुतीत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा असते. जयंत पाटील यांनाही भाजपाकडून ऑफर असल्याची राजकीय वर्तुळात असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग थांबवण्यात आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात शशिकांत किती यशस्वी ठरणार? तसेच आगामी निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे यांची जादू चालणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शशिकांत शिंदे यांची कारकीर्द अशी होती, ते जाणून घेऊया...

शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते

शशिकांत शिंदे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.  शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघात सक्रीय असून, ते दोनदा आमदार झालेले आहेत. शशिकांत शिंदे विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसे शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद असून, आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, १९९९ मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडूक जिंकली. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जलसंधारण मंत्री म्हणून काम केले. २००९ ते २०१४ दरम्यान शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते दोन वेळा जावळी आणि दोनदा कोरेगावमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. तर २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. २०२४ मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारShashikant Shindeशशिकांत शिंदेShashikant Shindeशशिकांत शिंदे