शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शरद पवार भानगडीत सापडत नाही, शिवचरित्र वाचल्याचा परिणाम दिसतोय- नामदेवराव जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 17:12 IST

शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेले पैसे लोहगडावर ठेवले होते, राजगडावर नाही. पैसे कधीच घरात ठेवायचे नसतात. ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असतात.

ठाणे : शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेले पैसे लोहगडावर ठेवले होते, राजगडावर नाही. पैसे कधीच घरात ठेवायचे नसतात. ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे असतात. परंतु नाशिकच्या एका माणसाला ते कळले नाही. पैसे जमा करता करता स्वत: आतमध्ये जमा आहेत. मात्र शरद पवार कोणाच्या भानगडीत सापडल्याचे कधी ऐकले नाही. शिवचरित्र वाचल्याचा परिणाम दिसतोय. आरोप चिक्कार झाले तरी काय यंत्रणा हलवतात माहीत नाही पण ते सहीसलामत सुटतात, अशा शब्दांत नामदेवराव जाधव यांनी कोपरखळी मारली.रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बुधवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात पार पडले. यावेळी नामदेव जाधव यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. शिवरायांच्या काळात तेव्हा शिंदे, होळकर अशी मराठी माणसे ठरवत होते की, दिल्लीचा बादशहा कोण असेल आणि गेल्या अनेक वर्षांत आपण एकही पंतप्रधान देशाला देऊ शकलो नाही. मराठी माणूस पंतप्रधान का झाला नाही, असे अनेक जण विचारतात. कारण एकही मराठी राजकारणी किल्ल्यांकडे फिरकत नाही. जोपर्यंत मराठी माणूस किल्ल्यांकडे जात नाही तोपर्यंत पंतप्रधान होऊ शकत नाही. सुमारे 40 खासदार असलेले देवेगौडा पंतप्रधान झाले आणि 48 खासदार असलेला महाराष्ट्र पंतप्रधानपदाचा उमेदवार देऊ शकत नाही. कारण आपण शिवरायांच्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले आहे, अशा शब्दात जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.शिवरायांचे मॅनेजमेंट वयाच्या 12व्या वर्षांपासून सुरू झाले होते. महाराजांनी आपल्या आयुष्यातील 18316 पैकी 16242 दिवस निवांत बसून काढले आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्त्वाचा वापर त्यांनी केला. मात्र त्यांचे मॅनेजमेंट मराठी माणसांना कळले नाही. ते गुजराती, सिंधींना कळले. त्यांनी महाराजांचे ऐकून उद्योग, व्यवसाय सुरू केले. महाराजांनी छापा टाकायला शिकवले. मात्र मराठी माणसं आज नोकरीच्या मागे धापा टाकतात. केवळ दुकानाच्या पाट्या मराठी करून चालणार नाही. त्यातील दुकानदार मराठी असला पाहिजे. यूपी, बिहारच्या फेरीवाल्यांना, वडापाववाल्यांना मारण्यापेक्षा त्यांच्या बाजूला आपण एखादी गाडी टाकून व्यवसाय सुरू केला पाहिजे, अशा शब्दात जाधव यांनी मराठी माणूस आणि त्याच्या सध्या परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले.मराठी माणसांनीच, काही कीर्तनकारांनी काही कादंबरीकारांनी त्यांची बदनामी केली. विश्व वंदिता असलेल्या शिवरायांना आपण केवळ महाराष्ट्राचे आराध्यदैवत केले. हत्ती एवढ्या माणसाची आपण मुंगी एवढं करून ठेवलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद वडके तसेच आमदार संजय केळकर उपस्थित होते.सैराटनंतर मुलं पालकांविरोधात बंड करायला तयार शिवरायांचे प्रत्येक शिलेदार हे तत्पर होते. गाफिल नव्हते. मात्र आजची मुलं ही गाफील आहेत , काबील नाही. मुलांच्या हातातील मोबाईलवरील व्हॉटस्अप, फेसबुकला आळा घाला. नाही तर मुलं त्याच व्हॉटसअॅपवरून तुम्हाला त्यांच्या लगAाची निमंत्रणो पाठवतील. अशी अनेक प्रकरणो घडत आहेत.सैराट चित्रपट आल्यापासून मुलं तर आईवडिलांच्या विरोधात अगदी बंडच करायला तयार झालीत.मात्र ते कृत्रिम, काल्पनिक आहे. रिल लाईफ अॅण्ड रिअल लाईफमध्ये फरक आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :thaneठाणेSharad Pawarशरद पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज