शरद पवारांनी महाराष्ट्रात संस्थांत्मक भ्रष्ट्राचार आणला - अमित शहा

By Admin | Updated: September 18, 2014 21:16 IST2014-09-18T21:00:25+5:302014-09-18T21:16:04+5:30

लोकमान्य टिळक आणि पुण्याच्या इतर वैशिष्ट्यांवर स्तुतीसुमने उधळत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

Sharad Pawar brought organizational corruption into Maharashtra - Amit Shah | शरद पवारांनी महाराष्ट्रात संस्थांत्मक भ्रष्ट्राचार आणला - अमित शहा

शरद पवारांनी महाराष्ट्रात संस्थांत्मक भ्रष्ट्राचार आणला - अमित शहा

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - लोकमान्य टिळक आणि पुण्याच्या इतर वैशिष्ट्यांवर स्तुतीसुमने उधळत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. कार्यकर्त्यांसह प्रसिद्धीमाध्यमंही अमित शहा यांच्या भुमिकेबाबत उत्सुकता होती. त्यांनी भाषणा दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. शरद पवार यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक घोटाळा आणला. महाराष्ट्रातील साखर कारखाने का बंद पडले, देशातील शेतकरी का आत्महत्या करत आहेत, असे प्रश्न सभेत उपस्थितांना विचारत त्यांनी या सर्व अराजकतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरले आहे.
त्याचप्रमाणे, शहा यांनी आपल्या भाषणात मनमोहन सिंग आणि माँटेक सिंग अहलुवालिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टिकेची झोड उठवली. सिंग हे अमेरिकेच्या भुमिकेची वाट पाहत बसायचे. लाल किल्ल्यावर भाषण करताना ते बुलेटप्रुफ काचेत बंद होऊन भाषण वाचून दाखवत असंत असं ते म्हणाले. तर पाक कडून हल्ला झाला असता. भारतीय सैनिक आदेशाची वाटपाहत असत. पण आता आम्ही सैनिकांना गोळीबारीला थेट प्रत्युत्तर द्या असं सांगितलं आहे. तसेच पाकिस्तानने वाटाघाटी प्रकरणी फउटिरता वाद्यांशी चर्चाकेल्याने आम्ही सचिव दर्जाची चर्चा थांबली. हे फक्त आमचं सरकारंच करु शकतं अस शहा यांनी म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात मित्रपक्षांचा उल्लेख आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचा उल्लेख करण्याचे टाळले आहे

Web Title: Sharad Pawar brought organizational corruption into Maharashtra - Amit Shah