शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही दादांची इच्छा होती" शरद पवारांचा बारामतीतून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 06:37 IST

Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील 'गोविंदबाग' येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आणि भावनिक खुलासे केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे राष्ट्रवादी (शरद पवार) चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या विषयावर सध्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले.

शरद पवार म्हणाले की, 'सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्याकडे यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. कदाचित, मुंबईत कुठेतरी चर्चा झाली असेल आणि त्यांनी काही निर्णय घेतला असेल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. यावर मी भाष्य करणार नाही.' शपथविधीला उपस्थित राहणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, 'शपथविधी होणार की नाही, हेच माहिती नाही. त्यामुळे जाण्याचा प्रश्नच उ‌द्भवत नाही.'

राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला.

या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते. दादांची इच्छा होती की, पक्ष एकत्र यावेत. ती इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई का होत आहे आणि यामागे कोणाचा हात आहे? या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar reveals Dada wanted both parties to unite.

Web Summary : Sharad Pawar stated he was unaware of Sunetra Pawar's oath. Merger talks were ongoing, led by Ajit Pawar, before his death. Dada desired party unity, a wish Sharad Pawar also shares. He declined to comment on the haste surrounding Sunetra Pawar's oath.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार