शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१८ जानेवारीपर्यंत घराबाहेर पडू नका; डॉक्टरांनी दिला खासदार शरद पवारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:03 IST

शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवारांना लगेच घरी सोडण्यात येईल. त्यानंतर पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामास असतील

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार असून उद्या पवारांच्या डोळ्यावर मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचं  शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते परंतु पवारांना सक्तीची विश्रांती दिल्यानं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांवर उद्या रुग्णालयात ऑपरेशन होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. 

मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार आहेत. पवारांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असून संसर्ग टाळण्यासाठी शरद पवारांना १८ जानेवारीपर्यंत सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार १८ जानेवारीपर्यंत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत. 

शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवारांना लगेच घरी सोडण्यात येईल. त्यानंतर पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामास असतील. १८ जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर पडू नका असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्यामुळे घरातूनच ते पक्षाच्या कार्यक्रमाला अथवा बैठकीला हजर राहतील अशी माहिती NCP नेत्यांकडून देण्यात आली आहे. 

पवार रुग्णालयातून थेट पोहचले होते शिर्डीत नोव्हेंर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं रुग्णालयात उपचार घेत होते. या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिले होते. रुग्णालयातून शिर्डीला येत आणि पुन्हा शिर्डीतून रुग्णालयात जाऊन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना उत्साह दाखवून दिला होता. पवारांच्या या कार्यक्रमातील सहभागाचे आणि उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. विशेष म्हणजे विरोधकांनाही शरद पवारांमधील या ऊर्जेचं कौतुक वाटलं होतं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार