मराठीतील पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं निधन

By श्रीनिवास नागे | Published: January 25, 2023 03:24 PM2023-01-25T15:24:52+5:302023-01-25T15:25:33+5:30

Shantabai Krishnaji Kamble: मराठी साहित्यातील पहिल्या दलित महिला - आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे आज दिनांक २५/०१/२०२३ रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

Shantabai Krishnaji Kamble, the first Dalit woman autobiographer in Marathi, passed away | मराठीतील पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं निधन

मराठीतील पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं निधन

Next

मराठी साहित्यातील पहिल्या दलित महिला - आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे आज दिनांक २५/०१/२०२३ रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०० वर्षाच्या होत्या.त्यांच्या निधनाने जणू एक कालखंडाचा दुवाच निखळला आहे. आपल्या शंभर वर्षांच्या आयुष्यात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी अशा दिग्गजांचा सहवास लाभला. त्यांचं आत्मचरित्र ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेतही अनुवादित झालंय. मुंबई दूरदर्शनवरही  'नाजुका' या मालिकेतून त्यांची आत्मकथा सादर झाली होती. त्यांचं जीवनचरित्र भावी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही. भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रा.अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Shantabai Krishnaji Kamble, the first Dalit woman autobiographer in Marathi, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.