शंकर म्हेत्रे याला १४ दिवसांची कोठडी

By Admin | Updated: June 20, 2015 00:21 IST2015-06-20T00:21:24+5:302015-06-20T00:21:24+5:30

तहसीलदार गुरू बिराजदार यांना मारहाण प्रकरणी शंकर सातलिंगाप्पा म्हेत्रे याला गुरुवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ बी़ पेठकर

Shankar Mhetre to 14-day custody | शंकर म्हेत्रे याला १४ दिवसांची कोठडी

शंकर म्हेत्रे याला १४ दिवसांची कोठडी

अक्कलकोट : तहसीलदार गुरू बिराजदार यांना मारहाण प्रकरणी शंकर सातलिंगाप्पा म्हेत्रे याला गुरुवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ बी़ पेठकर यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार बिराजदार ९ मे रोजी दुधनी येथील फ्रुटीबार आॅर्केस्ट्रा हा नियमानुसार चालतो का नाही, याबाबत तपासणी करण्यास गेले होते़ या वेळी विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा भाऊ व अक्कलकोट तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे याने बिराजदार यांना शिवीगाळ केली व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता़ त्यानंतर पळून गेलेला शंकर म्हेत्रे दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आल्यावर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी म्हेत्रे याचे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता़

Web Title: Shankar Mhetre to 14-day custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.