शनीशिंगणापूरच्या विश्वस्तपदी पहिल्यांदाच दोन महिलांची निवड

By Admin | Updated: January 6, 2016 16:42 IST2016-01-06T16:37:31+5:302016-01-06T16:42:50+5:30

शनिशिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांचा एक क्रांतिकारी घटना घडली आहे. येथील शनीशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्तमंडळावर दोन महिलांची निवड करण्यात आली आहे.

Shanishingnapur Trust's first woman candidate for the first time | शनीशिंगणापूरच्या विश्वस्तपदी पहिल्यांदाच दोन महिलांची निवड

शनीशिंगणापूरच्या विश्वस्तपदी पहिल्यांदाच दोन महिलांची निवड

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ६ - शनीशिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांचा एक क्रांतिकारी घटना घडली आहे. येथील शनीशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्तमंडळावर पहिल्यांदाच दोन महिलांची निवड करण्यात आली आहे.
देवस्थान विश्वस्तमंडळावर निवडल्या जाणा-या ११ सदस्यांपैकी दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये अनिता शेटे आणि शालिनी लांडे या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अहमदनगर धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात आली. 
शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महिलेने चौथ-यावर जाऊन शनीचे दर्शन घेतले तसेच देवाला तेलही वाहिले. यामुळे गावकरी संतप्त झाले व त्या निषेधार्थ शनी शिंगणापूर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद मागे घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
या घटनेनंतर त्या महिलेच्या धाडसाचे देशभरातून कौतुक करण्यात आले होते. तसेच देशभरातील ज्या मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे तेथेही महीलांना प्रवेश मिळावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

 

Web Title: Shanishingnapur Trust's first woman candidate for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.