दलित महासंघाचे ‘शेण फेको’ आंदोलन

By Admin | Updated: January 17, 2015 05:30 IST2015-01-17T05:30:11+5:302015-01-17T05:30:11+5:30

जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील गैरकारभाराच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ‘शेण फेको’ आंदोलन

'Shana Phako' movement of Dalit Federation | दलित महासंघाचे ‘शेण फेको’ आंदोलन

दलित महासंघाचे ‘शेण फेको’ आंदोलन

कोल्हापूर : जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील गैरकारभाराच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ‘शेण फेको’ आंदोलन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यकर्त्यांनी शेण फेकून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांना हा प्रकार हाणून पाडत त्यांना रोखत जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांच्यासह पाच-सहा जणांस आत जाण्यास परवानगी दिली. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अधिकारी वृषाली शिंदे यांच्या टेबलावर शेण फेकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: 'Shana Phako' movement of Dalit Federation