शाहरूखची कोलकाता नाइट रायडर्स नफ्यात

By Admin | Updated: May 9, 2016 22:55 IST2016-05-09T19:12:26+5:302016-05-09T22:55:13+5:30

चढ-उतारातही शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने पैशांच्या बाबतीत मात्र सर्वांवरच मात केली

Shahrukh's Kolkata Knight Riders' Profit | शाहरूखची कोलकाता नाइट रायडर्स नफ्यात

शाहरूखची कोलकाता नाइट रायडर्स नफ्यात

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9- आयपीएलच्या मैदानात संघांमध्ये खेळण्याच्या बाबतीत कायम चढ-उतार पाहायला मिळाली. या चढ-उतारातही शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने पैशांच्या बाबतीत मात्र सर्वांवरच मात केली आहे. आतापर्यंतच्या साऱ्याच संघांमध्ये केकेआरला सर्वाधिक फायदा झाला असून, महसूल मिळवण्यातही केकेआरने बाजी मारली आहे. त्यामुळे शाहरुख खानची केकेआर सध्या चांगलीच फॉर्मात आहे. गुणतालिकेत 12 क्रमांक मिळवलेल्या केकेआरनं आतापर्यंत 6 सामने जिंकले आहेत. तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र तरीही पैशांचा बाबतीत केकेआर संघानं बाकीच्या संघांना मागे टाकलं आहे.  

Web Title: Shahrukh's Kolkata Knight Riders' Profit