शाहरुख मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य - संजय राऊत
By Admin | Updated: November 4, 2015 20:58 IST2015-11-04T20:58:21+5:302015-11-04T20:58:21+5:30
शाहरुख खान मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारत सहिष्णू आहे म्हणूनच शाहरुख खान एवढा मोठा सुपरस्टार झाला असल्याचेही ते म्हणाले.

शाहरुख मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य - संजय राऊत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - शाहरुख खान मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारत सहिष्णू आहे म्हणूनच शाहरुख खान एवढा मोठा सुपरस्टार झाला असल्याचेही ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने मात्र शाहरुखची चांगलीच पाठराखण केली आहे. ‘शाहरुख मुस्लीम आहे म्हणून त्याच्यावर निशाणा साधता कामा नये’ असं म्हणत सेनेकडून आश्चर्यकारकरित्या शाहरुखचे समर्थन करण्यात आले आहे.
शाहरुखच्या वक्तव्यावर भाजप नेते कैलास विजयवर्गदीय यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. ‘शाहरुख भले भारतात राहत असला तरीही त्याचा ‘आत्मा’ मात्र पाकिस्तानात आहे.” भारतात सध्या असहिष्णुता वाढते आहे. असं वक्तव्य शाहरुखनं केलं होतं.
संजय राऊत यांनी विजयवर्गीय यांनाच खडे बोल सुनावले. ‘सहिष्णुतेच्या बाबतीत चर्चा करीत असताना भाजप नेत्याने पाकिस्तानला मध्ये आणण्याची गरज नाही. हा आपला अंतर्गत मामला आहे. तसेच राऊत यांनी शाहरुखला सल्ला दिला. ‘पहिली गोष्ट म्हणजे शाहरुखने सहिष्णुतेबाबतच्या चर्चेत उडी घेण्याची गरज नव्हती.’
शाहरुखबाबत केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर विजयवर्गीय यांच्यावर चहूबाजूने टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपलं ते ट्विट डिलीट केलं आहे.