शाहरूख, गौरी खानसह जुहीला ईडीची नोटीस

By Admin | Updated: March 25, 2017 02:42 IST2017-03-25T02:42:09+5:302017-03-25T02:42:09+5:30

इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स संघाचे संघमालक अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला यांना

Shahrukh, Gauri Khan and Juhu Eddie's notice | शाहरूख, गौरी खानसह जुहीला ईडीची नोटीस

शाहरूख, गौरी खानसह जुहीला ईडीची नोटीस

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स संघाचे संघमालक अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला यांना परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) शुक्रवारी ‘कारणे द्या’ नोटीस बजावली आहे. ५ एप्रिलपासून आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोलकाता नाइट रायडर्स संघाला ऐन वेळी बसलेला हा धक्का समजला जात आहे. ईडीच्या नोटिसीमुळे संघासमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेकडो कोटी रुपयांच्या य्व्यवहारात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shahrukh, Gauri Khan and Juhu Eddie's notice