शाहीर प्रमोद लोखंडे कला पथकाच्या जीपला अपघात, चौघांचा मृत्यू

By Admin | Updated: May 3, 2016 15:30 IST2016-05-03T12:34:11+5:302016-05-03T15:30:45+5:30

जिल्ह्यातील अहमदपूर आणि रेणापूर येथील भीमगितांचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेली तवेरा कार महापूरच्या पुलावरून नदी कोसळली़ या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले

Shahir Pramod Lokhande accident case: Jeep gets death | शाहीर प्रमोद लोखंडे कला पथकाच्या जीपला अपघात, चौघांचा मृत्यू

शाहीर प्रमोद लोखंडे कला पथकाच्या जीपला अपघात, चौघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. 05 : जिल्ह्यातील अहमदपूर आणि रेणापूर येथील भीमगितांचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेली तवेरा कार महापूरच्या पुलावरून नदी कोसळली़ या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले तर चौघांवर उपचार सुरू आहेत़ ही घटना मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली़ त्यांचा मंगळवारी नवी मुंबईच्या ऐरोली भागात भिमगीतांचा कार्यक्रम होणार होता़ 

या घटनेत विजय मस्के, राहूल मस्के (बोरगाव, गंगाखेड), आनंद शिरसाट (गुंजोटी, अहमदपूर) आणि रामकृष्ण मुलुखपाडे (कोरगाव, लोहा) या चौघांचा जागीच मृत्यू झाला़ सिनेगायक प्रमोद लोखंडे (नागठाणा, अहमदपूर), बाजीराव गोडबोले (जांब, जळकोट), राजेंद्र सोनकांबळे (कोष्टगाव, अहमदपूर) आणि राजकुमार ढगे (किनगाव, अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत़ गायन पार्टीचे प्रमुख प्रमोद लोखंडे यांना सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ़ किनीकर यांनी सांगितले़ 
अपघात होताच एका जखमीने लातूरच्या नातलगांना घटनेची माहिती दिली़ नातलगांनी पोलिसांना कळविले़ रेणापूर पोलिसांच्या गस्ती पथकाने जखमींना १०८ रूग्णवाहिकेच्या मदतीने लातूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविले़ आठपैकी चारजणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ याप्रकरणी रेणापूर पोलिसांत गुन्हा नोंद केल्याची माहिती निरीक्षक बंडोपंत कुलकर्णी यांनी दिली़ हा अपघात स्टेअरिंग रॉड तुटल्याने घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे़

Web Title: Shahir Pramod Lokhande accident case: Jeep gets death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.