शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:56 IST

Shahajibapu Patil And Shivsena : बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आले असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत, तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करा" असं म्हणत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच "तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती"

"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचं काय होणार याची चिंता सामना पेपरने करू नये. तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती आहे. जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करतं आहे. दोन्ही नेते चांगले अनुभवी आहेत. जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे" असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

"तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं"

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून आहे त्यांना खोके दिसत आहेत. त्यांचं आयुष्यच खोक्यावरच गेलं. सगळे खोक्याचेच गडी. त्यामुळे त्यांना आता यांना किती खोके मिळाले हे वाटतंय. तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे