शहाद्यात भरदिवसा ४.५ लाख लांबविले

By Admin | Updated: February 27, 2016 02:04 IST2016-02-27T02:04:21+5:302016-02-27T02:04:21+5:30

मोटारसायकलला धडक मारुन साडेचार लाख रुपयांची बॅग धूम स्टाईलने लांबविल्याची घटना खरेदी विक्री संघाच्या संकुलाजवळ शुक्रवारी दुपारी घडली. बॅग मालकाने शिरूड

In Shahada, it was 4.5 lakhs day by day | शहाद्यात भरदिवसा ४.५ लाख लांबविले

शहाद्यात भरदिवसा ४.५ लाख लांबविले

शहादा (जि. नंदुरबार) : मोटारसायकलला धडक मारुन साडेचार लाख रुपयांची बॅग धूम स्टाईलने लांबविल्याची घटना खरेदी विक्री संघाच्या संकुलाजवळ शुक्रवारी दुपारी घडली. बॅग मालकाने शिरूड चौफुलीपर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही.
परिवर्धा येथील माजी उपसरपंच भरत विठ्ठल पाटील यांनी कर्ज भरण्यासाठी एका बँकेतून चार लाख ५० हजार रुपये काढले व पैशांची बॅग मोटारसायकलला लावून ते दुसऱ्या बँकेकडे जात होते. खरेदी-विक्री व्यापारी संकुलाजवळ मागून वेगाने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने पाटील यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे भरत यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचा फायदा घेत मागून आलेल्या दोघांनी पाटील यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग घेऊन प्रकाशाकडे धूम ठोकली. पोलीस पथकानेदेखील प्रकाशापर्यंत चोरट्यांचा मागोवा घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: In Shahada, it was 4.5 lakhs day by day