शहा यांनी टाळला ‘महायुती’चा उल्लेख

By Admin | Updated: September 18, 2014 23:52 IST2014-09-18T23:52:26+5:302014-09-18T23:52:26+5:30

पुण्यातील मेळाव्यात शहा यांनी भाषणात शिवसेना अथवा महायुतीचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयीचा संभ्रम वाढला आहे.

Shah refused to mention 'Mahayuti' | शहा यांनी टाळला ‘महायुती’चा उल्लेख

शहा यांनी टाळला ‘महायुती’चा उल्लेख

पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपा व शिवसेनेत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यावर काय भूमिका घेणार, याची उत्सुकता होती. मात्र, पुण्यातील मेळाव्यात शहा यांनी भाषणात शिवसेना अथवा महायुतीचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयीचा संभ्रम वाढला आहे. तर, पदाधिकारी मात्र महायुती कायम राहणार असल्याची भूमिका मांडत आहेत. 
आज संघर्ष यात्रेला जाऊन आलो़ मी जनतेची नस जाणतो़ जनता तुमचे स्वागत करायला तयार आह़े सरकार कोण बनविणार, याची चिंता तुम्ही करू नका़ केवळ आपला बूथ जिंकला, तर भाजपा आपोआप जिंकेल, असा संदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज कार्यकत्र्याना दिला़ या वेळी अमित शहा यांचा पुणोरी पगडी, भवानी तलवार देऊन सत्कार करण्यात आला़ गुजराथी केळवणी समाजाच्या वतीनेही शहा यांचा सत्कार करण्यात आला़ 
लोकसभा निवडणुका भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन, शिवसंग्राम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकत्रित लढविल्या होत्या. परंतु, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर जागावाटपावरून महायुतीतील तिढा कायम आहे. अमित शहा हे महाराष्ट्रात आल्यानंतर जागावाटपाविषयी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याची चर्चा होती. परंतु, शहा यांनी अद्याप ठाकरे यांच्याशी कोणतेही चर्चा केलेली नाही. 
शिवाय पुण्यातील भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्रातील जाहीर मेळाव्यात शहा यांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे अथवा महायुतीतील घटक पक्षांचा कोणताही उल्लेख केला नाही. उलट भाजपाची महाराष्ट्रात सत्ता आणण्याचे आवाहन  केले. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयी  संभ्रम निर्माण झाला आहे. 
या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, की साडेतीन वर्षे महाराष्ट्र दिला होता़ एकतरी काम दाखवा़ गेला एक महिना तुमचा लकवा कोठे गेला होता़ अडचणीत आले की शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणा:या छगन भुजबळ यांनी त्यांच्या एमएटीमध्ये एका तरी कोर्ससाठी ओबीसींना आरक्षण ठेवले आहे का? सामाजिक न्याय मनात असावा लागतो़ तो कृतीतून दिसावा लागतो़ 
गेल्या 15 वर्षात या सरकारने पोलिसांना चांगली बुलेटप्रूफ ज्ॉकेट दिली नाही़ ती दिली असती, तर कामटे, साळसकर, करकरे यांना प्राण गमवावे लागले नसते, असे सांगत फडणवीस यांनी आर. आर. पाटील यांच्यावर निशाणा साधला़ 
विनोद तावडे म्हणाले, मुंबईतील एफएसआय वाढ, उद्योगांना टॅक्समध्ये सवलती, उद्योगांना जमिनी देताना या सरकारने कोटय़वधींचा भ्रष्टाचार केला आह़े 11 लाख 88 हजार कोटींचा आकडा खरा असून सत्तेवर आल्यावर पै पैचा हिशेब मागू़ तावडे म्हणाले, युतीची चिंता वरिष्ठ नेत्यांवर सोडा़ तुम्ही जमिनीवर कामाला लागा़ भ्रष्ट, धोरण लकवा असलेल्या सरकारला गाडण्याची संधी आली आहे. 
पंकजा मुंडे -पालवे म्हणाल्या, की हे नेते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत़ त्यांचे ऑक्सिजनचे मास्क काढून घेण्याची गरज आह़े पुणो शहरातील आठही जागा जिंकू, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी या वेळी दिल़े यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात आर.आर. पाटील यांचा समाचार घेतला. 
शहा यांच्या भेटीसाठी 
आरपीआय कार्यकर्ते
रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट)कार्यकत्र्यानी खासदार अनिल शिरोळे यांच्या निवासस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे आदींनी शहा यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. शहा यांच्या सन्मानार्थ शिरोळे यांनी मेजवानीचे आयोजन केले होते. शहा यांनी त्याचा आस्वाद घेतला. त्यांच्या प}ीही सोबत होत्या.
रात्री नऊनंतर शहा मार्केट यार्ड येथील एका नातलगाच्या भेटीसाठी रवाना झाले. आपटे रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. शिरोळे यांच्या निवासस्थानी अनेकांनी शहा यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.(प्रतिनिधी)
 
आता सटकली नाही, टरकली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका करताना ‘आता माझी सटकली,’ असे सांगितले होत़े त्याचा उल्लेख करुन विनोद तावडे म्हणाले, ‘‘त्या सभेत अतिशय करमणूक चालली होती़ काका ध चा मा करतात़ हे म्हणतात आता माझी सटकली़ त्यांची सटकली नाही़ ‘दादा आता तुझी बारी़’ खरं म्हणजे टरकली़’’ 
 
लक्ष्मीदर्शन घेऊन 
फायलींचा आढावा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘एक महिना यांना लकवा नव्हता़ संजय काकडे यांना माहिती असेल कशा कशा फायलींवर सह्या झाल्या़ दादा-बाबांनी लक्ष्मीदर्शन घेऊन सह्या केलेल्या प्रत्येक फायलीचा सत्तेत आल्यावर आढावा घेऊ़ जनविरोधी असेल, तर रद्द करु़’’
 
मनसेमध्ये दाबण्याचा प्रयत्न झाल्यानेच भाजपामध्ये : राम कदम
पुणो : घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची 24 तास कामे करणारा आमदार असतानाही दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील  काहींनी मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी माङयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव व प्रेम होते. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार राम कदम यांनी आज स्पष्ट केले. 
गेल्या काही दिवसांपासून मनसेवर नाराज असलेले राम कदम पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना गैरहजर राहत होते. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. परंतु, ते नेमके कोणत्या पक्षात जाणार, हे निश्चित नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभेच्या तोंडावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राम कदम यांनी आज जाहीर प्रवेश केला. त्यानंतर ते म्हणाले,  ‘‘माङो आजही राज ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. परंतु, पक्षातील काही जणांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला. चांदिवलीतील एक जण घाटकोपरमध्ये इच्छुक आहे. परंतु, याभागातील जनतेची मी अहोरात्र सेवा केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रेमामुळे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.’’
 

 

Web Title: Shah refused to mention 'Mahayuti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.