मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: July 7, 2017 21:44 IST2017-07-07T21:06:24+5:302017-07-07T21:44:19+5:30

वडिलांच्या मित्रांसह चौकडीकडून १५ वर्षाच्या मुलीवर २४ तास लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली.

Sexual harassment of minor girls in Mumbai | मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - वडिलांच्या मित्रांसह चौकडीकडून १५ वर्षाच्या मुलीवर २४ तास लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली. दरम्यान, मुलीचे अपहरण ट्रॉम्बेमधून झाले असल्याने याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो, अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. तर एका पसार आरोपीचा शोध सुरु आहे.
मानखुर्द परिसरात १५ वर्षाची नेहा (नाव बदलले आहे) कुटुंबीयांसोबत राहते. बुधवारी दुपारी वडिलांचा मित्र असलेल्या ३२ वर्षाच्या इसमाने तिला सोबत फिरायला येण्यास सांगितले. नेहानेही कुणालाही काही न सांगता दुपारी दोन वाजता घर सोडले. तो तिला घेऊन भांडुपमधील अन्य आरोपीच्या घरी घेऊन आला. तेथे त्याचे १९ ते २० वयोगटातील अन्य तीन मित्र तळ ठोकून होते. त्यांनी दरवाजा बंद करुन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरु होते. त्यानंतर तिला धमकाहून घरी पाठविण्यात आले. 
मुलगी गायब झाली म्हणून  तिच्या कुटुंबीयांनी बुधवारीच ती हरविल्याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. गुरुवारी नेहाने घरी येऊन झालेल्या प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार ,अपहरणाचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला. याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना १२ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 

Web Title: Sexual harassment of minor girls in Mumbai