लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: July 29, 2016 21:23 IST2016-07-29T21:23:13+5:302016-07-29T21:23:13+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर ठाण्यासह वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणाऱ्या राहुल सैंदाणे (२३) विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Sexual harassment on the girl by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ : लग्नाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर ठाण्यासह वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणाऱ्या राहुल सैंदाणे (२३) विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर रोड, दर्शन टॉवरसमोरच्या परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या या दोघांची आपसात चांगली ओळख होती. त्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी, कापूरबावडी, मानपाडा तसेच येऊर येथील चाळीतील एका खोलीवर नेऊन तिच्यावर एप्रिल २०१५ ते २७ जुलै २०१६ या काळात लैंगिक अत्याचार केले. ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिला काही घरगुती औषधे देऊन तिचा त्याने जबरदस्तीने गर्भपातही केला. तिने याप्रकरणी २८ जुलै रोजी तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक तृप्ती खळदे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment on the girl by showing lover of marriage