पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: October 19, 2016 02:10 IST2016-10-19T02:10:38+5:302016-10-19T02:10:38+5:30

चित्रपटात स्टंटमॅनची भूमिका करणाऱ्या एका व्यक्तीला मालवणी पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

Sexual harassment of a five-year-old girl | पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार


मुंबई : चित्रपटात स्टंटमॅनची भूमिका करणाऱ्या एका व्यक्तीला मालवणी पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्याने पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मालवणी पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
मोहम्मद कुरेशी (५०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विविध हिंदी चित्रपटांत ‘स्टंटमॅन’ची भूमिका केल्याचे त्याचे म्हणणे आहे. तर पीडित मुलगी गतिमंद आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पाच वर्षीय मुलगी आणि तिची अजून एक मैत्रीण रविवारी संध्याकाळी कुरेशीच्या नातीसोबत खेळत होत्या. त्या वेळी पीडित मुलीला कुरेशी त्यांच्या घरात नेत असल्याचे तिने पाहिले. काही वेळाने ही मुलगी त्याच्या घरातून रडत परतली. तेव्हा तिच्या आईने तिला कारण विचारले. ज्यात कुरेशीने तिला घरी नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे या मुलीने सांगितले. तसेच हा प्रकार त्याने यापूर्वीही केल्याचे ती म्हणाली. त्यानुसार या प्रकरणी नातेवाइकांच्या सल्ल्याने या महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual harassment of a five-year-old girl