धिंड काढलेल्या तरुणावर लैंगिक शोषणाचा गुन्हा
By Admin | Updated: March 18, 2015 01:28 IST2015-03-18T01:28:08+5:302015-03-18T01:28:08+5:30
वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून धिंड काढलेल्या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

धिंड काढलेल्या तरुणावर लैंगिक शोषणाचा गुन्हा
अहमदनगर : वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून धिंड काढलेल्या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून शुक्रवारी एका तरुणाची विवस्त्र जाहीर धिंड काढण्यात आली होती. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील माहेश्वरीसह अन्य समाज संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून घटनेचा निषेध नोंदविला आहे. मात्र पीडित मुलीने सोमवारी तरुणाविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
फिर्यादी मुलगी १७ वर्षांची आहे. तरुणाने तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगत
तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तसेच कुठे वाच्यता केल्यास शरीरसंबंधाची क्लिप व्हॉट्सअॅपवर टाकीन, अशी धमकी दिली.
तरुणाने २१ डिसेंबर २०१४ व ६ जानेवारी २०१५ रोजी माझ्यावर अत्याचार केला. ९ मार्चला तारकपूर बसस्थानकाहून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)