खाऊचे अमिष दाखवून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: August 13, 2016 19:09 IST2016-08-13T08:28:15+5:302016-08-13T19:09:52+5:30

खाऊचे अमिष दाखवून शेजारी राहत असलेल्या विकृताने दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे

The sexual harassment of chimudhi by showing unhygienic food | खाऊचे अमिष दाखवून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

खाऊचे अमिष दाखवून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

>
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 -  खाऊचे अमिष दाखवून शेजारी राहत असलेल्या विकृताने दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुशांत रामबंदर सिंग (२३) असे आरोपी विकृताचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या या चिमुरडी प्रिया (नावात बदल ) सिंगची नजर पडली.  एकाच इमारतीत राहत असल्याने प्रिया सिंगला ओळखत होती. त्याने खाऊचे अमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या डोंगर भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीची किंकाळी कानी पड़ताच  स्थानिकांनी तेथे धाव घेतली. 
 सिंगला ताब्यात घेत नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सिंगला ताब्यात घतले. बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रियाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
सिंग त्याच इमारतीत आई वडिलांसोबत राहतो. सिंगला अपहरण, बलात्कार आणि पॉस्को कलमानवये पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. 

Web Title: The sexual harassment of chimudhi by showing unhygienic food