लोहगावात बालिकेवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: November 6, 2016 19:44 IST2016-11-06T19:44:41+5:302016-11-06T19:44:41+5:30

शनिवारी दुपारी लोहगावातील एका पाच वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Sexual harassment to the child in Ironclad | लोहगावात बालिकेवर लैंगिक अत्याचार

लोहगावात बालिकेवर लैंगिक अत्याचार

>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 6 -  पुण्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांची मालिका अद्यापही सुरुच असून, शनिवारी दुपारी लोहगावातील एका पाच वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 
केशव स्वामी ( २१, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 50 वर्षीय आजीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. आरोपी खासगी नोकरी करतो. तर पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. पिडीत मुलगी पाच वर्षांची असून ती दारामध्ये खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला गोड बोलून घरामध्ये बोलावून घेतले. तिला धाक दाखवत लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक जी. एस. पाटील करीत आहेत.

Web Title: Sexual harassment to the child in Ironclad