चिखलदरा (अमरावती) : येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अकरावीच्या विद्यार्थ्याशी तीन महिने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्याने तक्रार दिल्यानंतर या ४६ वर्षीय प्राध्यापिकेविरुद्ध मंगळवारी रात्री पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून चिखलदरा पोलिसांनी तिला अटक केली.७ डिसेंबर २०१७ ते ९ मार्च २०१८ या काळात झालेला लैंगिक छळ पीडित विद्यार्थ्याने वर्गशिक्षक, प्राचार्यांसमोर कथन केला. त्यांनी तत्काळ संस्थाचालक आणि संचालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले.विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्राध्यापिका आणि विद्यार्थ्याची संस्थाध्यक्ष, संचालक व नेमलेल्या समितीनेही याची चौकशी केली. यात सत्यता आढळून आल्याने पोलिसात तक्रार दिली.- अनिल प्रांजळे,प्राचार्य, सैनिक स्कूल
विद्यार्थ्याशी लैंगिक चाळे; प्राध्यापिकेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:56 IST