अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: June 27, 2014 23:37 IST2014-06-27T23:37:27+5:302014-06-27T23:37:27+5:30
खोपोली शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
>खालापूर : खोपोली शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. अलीकडे कर्जत ग्रामीणमधील एका आश्रमातील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना खोपोली मध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वत्न निषेध व्यक्त होत आहे.
शहरातील साईबाबा नगरमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा राहाटावडे येथील मंदिरात झोपलेला असताना रात्नी बाराच्या सुमारास देविदास महादेव मोकळ ( 34, राहणार राहाटावडे) याने त्याला आपल्या खोलीत नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या बाबत त्या मुलाने पोलिसठाण्यात तक्रार दिली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने यापूर्वी देखील असे कृत्य केले आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. पीडित मुलाच्या जबानीवरून पोलिस तपास सुरु झाला आहे. पीडित मुलाची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे . या घटनेचा शहरातील सर्वच स्थरातून निषेध व्यक्त होत आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी बी. पी. कल्लुरकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत. (वार्ताहर)