बालिकेवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: July 1, 2014 00:04 IST2014-07-01T00:04:59+5:302014-07-01T00:04:59+5:30

सहावर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पुनवासी राममिलन गौतम (वय 2क्, रा. कुदळवाडी, चिखली) याला अटक केली आहे.

Sexual Abuse on Girl Child | बालिकेवर लैंगिक अत्याचार

बालिकेवर लैंगिक अत्याचार

>पिंपरी : सहावर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पुनवासी राममिलन गौतम (वय 2क्, रा. कुदळवाडी, चिखली) याला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चिखली, कुदळवाडी येथे घडली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी त्याला न्यायालयाने सुनावली.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिका घरासमोर खेळत होती. दरम्यान, पुनवासी त्या ठिकाणी आला. त्याने बालिकेला उचलून जवळच असलेल्या एका खड्डय़ात नेले. बराच वेळ मुलगी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. एक जण बालिकेला घेऊन जात असताना पाहिल्याचे घराशेजारील एका मुलीने कुटुंबीयांना सांगितले. शेजारील मुलीने सांगितल्याप्रमाणो पीडित मुलीचा शोध सुरू होता.  
दरम्यान, पीडित बालिकेने आरडाओरडा केल्याने पुनवासी मुलीला घेऊन गेलेल्या ठिकाणी परिसरातील लोकांनी धाव घेतली. त्या वेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पळून जाण्याच्या प्रय}ात असलेल्या पुनवासी याला पकडून लोकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual Abuse on Girl Child