पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश
By Admin | Updated: July 12, 2017 15:13 IST2017-07-12T14:12:48+5:302017-07-12T15:13:17+5:30
भोसरी एमआयडीसी पोलिसांचा छापा; आरोपी महिला अटक

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - भोसरीतील अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली चालवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (11 जुलै ) भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या मसाज पार्लरवर छापा टाकला होता. यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली.
अलका अजय कदम (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. अलकाच हे पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिकरोड जय गणेश नगर येथील साईगंगा अपार्टमेंटमध्ये अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटर होते. या पार्लरबाबत पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला व सर्व गैरप्रकार उघडकीस आला.
सुटका करण्यात आलेल्या महिलांची पोलिसांनी भोसरीतील महिला आश्रमात पाठवणी केली आहे. दरम्यान, चौकशीमध्ये
महिलांचे बावधन येथेही मसाज सेंटर असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार आहे, असे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी सांगितले.