पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: August 25, 2016 15:06 IST2016-08-25T13:29:01+5:302016-08-25T15:06:07+5:30
पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून रॅकेट चालवणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे

पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
>- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवणारी ही महिला उझबेकिस्तानमधील असून पुण्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांना डेक्कन परिसरात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत असून अजून कोण यामध्ये सहभागी आहेत याची माहिती घेत आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेट उघडकीस आली आहेत. याआधी 11 ऑक्टोबर 2013 रोजी दोन उझबेकिस्तानमधील मुलींना पोलिसांनी अटक केली होती. तसंच काही दिवसांपूर्वीच पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेलाही पोलिसांनी अटक केली होती.