भुसावळमध्ये टिंबर मार्केटला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 01:45 IST2016-10-29T01:40:30+5:302016-10-29T01:45:34+5:30
येथील जलराम टिंबर मार्केटला रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

भुसावळमध्ये टिंबर मार्केटला भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 25 - येथील जलराम टिंबर मार्केटला रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
जलराम टिंबर मार्केट परिसरातील विरजू बन्सीलाल पासू यांच्या जुन्या वखारीला ही आग लागली त्यामुळे आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाला. दरम्यान, आग विझविण्यासाठी पालिका प्रशासनाने अद्याप अग्नीशमन दलाच्या गाड्या पाठविल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.
या आगीमुळे रहिवाशांची एकच धावपळ उडाली आहे. तसेच, आग ही फटाक्यांमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.