शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने घेतला सातवा बळी, साकूर शिवारात बालकाचा उचलून नेऊन घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 23:47 IST

 चाळीसगाव परिसरात बिबटयाचा धुमाकूळ सुरुच आहे. बुधवारी  बिबट्याने कुणाल प्रकाश अहिरे (७) या पहिलीत जाणाºया बालकाला उचलून नेऊन ठार केले.

 जळगाव-  चाळीसगाव परिसरात बिबटयाचा धुमाकूळ सुरुच आहे. बुधवारी  बिबट्याने कुणाल प्रकाश अहिरे (७) या पहिलीत जाणाºया बालकाला उचलून नेऊन ठार केले. साकूर- देवघट शिवारात बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा हा सातवा बळी आहे. दुसरीकडे उपखेड येथे बिबट्याने दुपारी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे सर्वांचा थरकाप उडाला आहे. 

  साकूर- देवघट हे मालेगाव तालुक्यात असले तरी चाळीसगाव- नाशिक हद्दीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतन शंकर बागूल यांचे साकूर शिवारात शेत आहे. शेतात बांधलेल्या झोपडीत त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) कुणाल अहिरे हा झोपण्यासाठी जात होता. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप मारुन त्याला ओढत नेले. आजोबा रतन बागूल यांनी शोधाशोध केली पण कुणाल कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांना संशय आला.   या घटनेपूर्वीच बिबट्याने जवळच असलेल्या सेवानगर वस्तीत मेंढ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे तिथले मेंढपाळ आणि वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला शोधत साकूरपर्यंत आले, त्यावेळी बागूल यांनी नातवाबद्दल सांगितले असता त्यांनी शोध घेतला. त्यावेळी रात्री १०.५० वाजेच्या सुमारास कुणालचे  धड बाजूच्याच शेतात आढळून आले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून मेहुणबारे पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी लागलीच साकूर शिवारात पोहचले होते.

बिबट्याच्याा हल्ल्यात महिला जखमी  उपखेड शिवारातील शेतात कापूस वेचत असताना बिबट्याने गायत्री सुरेश पाटील (३८) या महिलेवर हल्ला करुन जखमी केले. महिला व पुरुषांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. 

टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र