शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांनंतर ‘मॅट’ने निर्णय बदलला, उच्च न्यायालयाचा आदेश : खारीज केलेल्या याचिका पुनर्जीवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:39 IST

Court News: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सात वर्षांपूर्वी दिलेला निर्णय अखेर बदलला. नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर खारीज याचिका पुनर्जीवित करून नव्याने निर्णय देण्यात आला.

यवतमाळ - महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सात वर्षांपूर्वी दिलेला निर्णय अखेर बदलला. नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर खारीज याचिका पुनर्जीवित करून नव्याने निर्णय देण्यात आला. यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या कनिष्ठ अभियंतापदाच्या वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा झाला. राज्यभरातील १३ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांवर कनिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करताना अन्याय करण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या १८ जून १९९८च्या आदेशाला अनुसरून स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या पूर्वीच्या संवर्गाचा आणि आस्थापनेचा विचार वेतनश्रेणी मंजूर करताना झाला नाही. याविरोधात त्यांनी ‘मॅट’मध्ये दाद मागितली होती.  

असा दिला निर्णयसेवेतील तथा निवृत्त १३ संवर्गातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ४५ वर्षे पूर्णत्वाच्या तारखेपासून कनिष्ठ अभियंतापदाची वेतनश्रेणी मंजूर करावी. त्यावर आधारित सर्वप्रकारचे आर्थिक लाभ पुढील चार महिन्यांत सर्व संबंधितांना द्यावा, तसा आदेश विभागाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाचे सरचिटणीस रा. म. लेडांगे यांनी दिली. 

न्यायालयाचा निकाल विरोधात लागलावयाची ४५ वर्षे पूर्णत्वाच्या तारखेपासून कालबद्ध पदोन्नती योजनेंतर्गत कनिष्ठ अभियंतापदाच्या वेतनश्रेणीसाठी ‘मॅट’च्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ‘मॅट’ने याचिका खारीज केल्याने संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१८ मध्ये आव्हान दिले. यावर न्यायालयाने २२ जुलैला निकाल दिला. ‘मॅट’ने २०१७ मध्ये दिलेला निर्णय रद्द केला, संघटनेच्या दोन्ही याचिका पुनर्जीवित करून नव्याने सुनावणीचा आदेश दिला. तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेशात म्हटले. यानुसार ‘मॅट’ने सुनावणी घेतली व २०१७ मधील निर्णय मागेघेण्यात आला. 

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र