हल्ल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: April 30, 2016 00:35 IST2016-04-30T00:35:55+5:302016-04-30T00:35:55+5:30

प्राणघातक हल्ला करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड सुनावला

Seven years of education in the attack | हल्ल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

हल्ल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

पुणे : किरकोळ वादावादीमधून चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड सुनावला, तर न्यायालयाने पुराव्याअभावी तीन जणांची निर्दोष मुक्तता केली. ही घटना २१ डिसेंबर २००६ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली होती. डब्ल्यू. बलदेव दास (वय ३२, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमध्ये अनिल रामानंद दास (वय ३५, रा. पिंपरी) जखमी झाले होते, तर सहायक पोलीस फौजदार एच. एम. कांबळे यांनी फिर्याद दिली होती.
आरोपी, जखमी तसेच फिर्यादी बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहेत. समोसे बनविण्याचे काम करणारे सर्व जण २१ डिसेंबर २००६ रोजी रात्री ११.४५च्या सुमारास बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर दारूपीत बसले होते. गावाकडील चर्चा निघाल्यावर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. चिडलेल्या आरोपींनी दास याच्यावर सुरीने वार करून
त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने डब्ल्यू. बलदेव याला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. रणजित मोरे यांनी ६ साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)

Web Title: Seven years of education in the attack