नाशिकमध्ये सात हजार लिटर अल्कोहोल जप्त
By Admin | Updated: June 21, 2015 01:30 IST2015-06-21T01:30:52+5:302015-06-21T01:30:52+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने मालेगाव-मनमाड रोडवर शनिवारी सापळा रचून अल्कोहोलची अवैध वाहतूक करणारा

नाशिकमध्ये सात हजार लिटर अल्कोहोल जप्त
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने मालेगाव-मनमाड रोडवर शनिवारी सापळा रचून अल्कोहोलची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला़ त्यातून ४५ लाखांची ७ हजार ६०० लिटर अल्कोहोल जप्त करण्यात आले आहे.
भरारी पथकाने ट्रकचालक दिनेशकुमार विश्वकर्मा यास अटक केली आहे़ मुंबई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मालेगाव-मनमाड रोडवरून अल्कोहोलची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पथकाने सापळा रचून वऱ्हाणे शिवारातील श्रीकृष्ण ढाब्यासमोर ही कारवाई केली.