शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

तीन वर्षांत सात पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 18, 2016 02:45 IST

नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे.

पंकज रोडेकर,

ठाणे- कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण, याच कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांसह सात जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने स्वसंरक्षणार्थ दिलेल्या रायफल, रिव्हॉल्व्हर या शस्त्रांचा वापर झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या साडेपाच वर्षांत दोन हजारांहून अधिक जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. यामध्ये विविध कारणास्तव आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. या आत्महत्या त्यांना आलेल्या नैराश्येतून करीत असल्याचे बोलले जाते. बुधवारी रात्री तोच ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत २०१३, २०१४ या वर्षांत ठाणे, मुंबई आणि रेल्वे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केली आहे. या घडलेल्या घटनांमध्ये कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनीही त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रोड अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतले. तर, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. तसेच शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.>प्रकृती स्थिर: बुधवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.>मोकळेपणाने चर्चा केल्यास तणाव होतील दूरकाही मानसोपचारतज्ज्ञांनी बोलताना, प्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसऱ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून मार्ग काढणे वेळीच गरजेचे असल्याचे सांगितले.