शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जितेंद्र आव्हाडांसह सात जणांना मिळाले नाही पालकमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:18 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. त्यात सात जणांना पालकमंत्रीपद मिळू शकलेले नाही. या मंत्र्यांमध्ये संदीपान भुमरे (शिवसेना), जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, दत्ता भरणे (राकाँ),राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), विश्जित कदम (काँग्रेस) यांचा समावेश आहे.अहमदनगरमधील तनपुरे प्राजक्त, थोरात बाळासाहेब आणि गडाख शंकरराव हे तिघे मंत्री आहेत. पण त्यांच्या जिल्ह्णात बाहेरचा पालकमंत्री (हसन मुश्रीफ) देण्यात आला आहे. औरंगाबादमध्येही भुमरे संदीपानराव आणि अब्दुल सत्तार मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री (सुभाष देसाई) देण्यात आला आहे. सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्री करण्यात आले तर कॅबिनेट मंत्री भुमरे पालकमंत्र्यांच्या यादीत कुठेच नाहीत.कोल्हापूर जिल्ह्यात पाटील राजेंद्र, मुश्रीफ हसन आणि पाटील सतेज हे तिघे मंत्री असताना अहमदनगरचे बाळासाहेब थोरात यांना येथे पालकमंत्री करण्यात आले. मुश्रीफ यांना अहमदनगरचे तर सतेज पाटील पाटील याना भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली.मुंबई उपनगरात ४ मंत्री आहेत, पण मुंबई शहरातील आदित्य ठाकरे यांना येथील पालकमंत्री नेमण्यात आले. उपनगरातील सुभाष देसाई (औरंगाबाद), अस्लम शेख (मुंबई शहर), नवाब मलिक (परभणी), अनिल परब अनिल (रत्नागिरी) या सर्वांना इतर जिल्ह्णांचे पालकमंत्री करण्यात आले आहे. रत्नागिरीत सामंत उदय हे मंत्री असताना मुंबईतील अनिल परब यांना रत्नागिरीचे आणि सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री करण्यात आले.>सेनेचे १३, राष्ट्रवादीचे १२ आणि काँग्रेसचे ११शिवसेनेकडील जिल्हे असे - औरंगाबाद, धुळे, जळगाव, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, उस्मानाबाद आणि अकोला.राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेले जिल्हे - अहमदनगर, बीड, बुलडाणा, गोंदिया, जालना, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर. काँग्रेसकडील जिल्हे असे - अमरावती, भंडारा, चंद्रपूर, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, वर्धा

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड