मेळघाटात ५० दिवसांत सात माता मृत्यू!
By Admin | Updated: May 24, 2016 03:33 IST2016-05-24T03:33:14+5:302016-05-24T03:33:14+5:30
मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. १ एप्रिल ते २० मे या ५० दिवसांत सात गर्भवती

मेळघाटात ५० दिवसांत सात माता मृत्यू!
- गणेश वासनिक, अमरावती
मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. १ एप्रिल ते २० मे या ५० दिवसांत सात गर्भवती मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मागील वर्षी मेळघाटात सात मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात बहुतांश गर्भवती महिलांचा समावेश आहे.
यावर्षी मात्र दीड महिन्यांतच सात मातांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार माता घरीच दगावल्याची माहिती आहे.
आरोग्य यंत्रणेकडून आदिवासींना पुरेसे शिक्षण दिलेले नाही. त्यामुळे आजही मेळघाटात महिलांची प्रसुती घरीच केली जात असल्याचे विदारक चित्र आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था आदी बाबी कुपोषण, मातामृत्यूसाठी कारणीभूत आहेत. पावसाळा सुरू होण्यास १५ दिवसांचा अवधी असून आरोग्य यंत्रणेची अनास्था आदिवासींच्या मुळावर येईल.
शासकीय रुग्णालयात आदिवासी गर्भवती मातांना रक्तपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. प्रसूतीदरम्यान आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नाही. आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची वानवा आहे.
- बंड्या साने, अध्यक्ष, खोज संघटना
मेळघाटात जनजागृतीचा अभाव आहे. आदिवासी गर्भवती मातांना अनेकदा सांगूनही त्या घरीच प्रसुती करतात. आरोग्य यंत्रणेकडून विशेष मोहीम राबवून गर्भवती मातांचा शोध घेतला जातो. रुग्णालयातच प्रसुतीसाठी त्यांचे समुपदेशन केले जाते.
- डॉ. अरुण राऊत, शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती