विहिरीचे कठडे ढासळून सात मजूर गाडले गेले
By Admin | Updated: June 21, 2014 00:20 IST2014-06-21T00:20:37+5:302014-06-21T00:20:37+5:30
विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक सिमेंटचे संरक्षक कठडे ढासळून सात शेतमजूर विहिरीमध्ये गाडले गेले.

विहिरीचे कठडे ढासळून सात मजूर गाडले गेले
>वाढेगाव (जि़ सोलापूर) : विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक सिमेंटचे संरक्षक कठडे ढासळून सात शेतमजूर विहिरीमध्ये गाडले गेले. ही घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी 5.3क् वाजेर्पयत दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आल़े दोन पोकलेन, पाच जेसीबी, ट्रॅक्टर, टिप्पर, रुग्णवाहिका, अग्निशामक दल यांच्या सहाय्याने रात्री उशिरार्पयत शोधकार्य सुरू होत़े
संतोष मारुती रोडगे (32), अंकुश मारुती रोडगे (31), नामदेव केराप्पा डोईफोडे (22), दादा बापूसाहेब हजारे (27), दत्तात्रय आनंदा हजारे (22), ज्ञानू हणमंत हजारे (37) व विलास मोहन इंगवले (27) अशी गाडले गेलेल्या मजुरांची नावे आहेत़ तर तानाजी महादेव रोडगे व बिरा लक्ष्मण डोईफोडे हे सुदैवाने बचावले.
माण नदीपात्रत मधुकर दिघे यांच्या विहिरीचे खोदकाम दीड महिन्यापासून सुरू आहे. यासाठी जवळपास 35 ते 4क् फूट खोल खणण्यात आले होते. त्यावर सिमेंटची गोलाकार रिंग बांधली होती. विहिरीमधून 4क् फूट खोलीवरून क्रेनच्या साहाय्याने मजुरांकडून गाळ काढण्यात येत होता़
दरम्यान, नव्याने टाकलेल्या रिंगमुळे खाली तडे जाऊन खचल्याने विहिरीशेजारील वाळू व मातीचा भरावा ढासळला. गाळ भरणारे 6
मजूर व क्रेनचालकासह सात
जण विहिरीमध्ये गाडले गेले. (प्रतिनिधी)
परिसरातील दुसरी घटना
1994 मध्ये वाढेगाव परिसरात अशाच पद्धतीची घटना घडून रिंगमधील वाळू काढत असताना एक शेतकरी गाडला गेला होता. तो अथक प्रयत्न करूनही सापडला नव्हता.