यवतमाळमध्ये भीषण अपघातात सात ठार

By Admin | Updated: May 31, 2015 16:53 IST2015-05-31T16:27:36+5:302015-05-31T16:53:04+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील घाटी या गावात व-हाडी मंडळींना घेऊन जाणा-या बोलेरो गाडीला अपघात झाल्याने गाडीतील सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.

Seven killed in Yavatmal accident | यवतमाळमध्ये भीषण अपघातात सात ठार

यवतमाळमध्ये भीषण अपघातात सात ठार

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. ३१ - यवतमाळ जिल्ह्यातील घाटी या गावात व-हाडी मंडळींना घेऊन जाणा-या बोलेरो गाडीला अपघात झाल्याने गाडीतील सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. मृतांमध्ये चार महिला, दोन लहान मुलं व एका पुरुषाचा समावेश आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावातील लग्नाची वरात घाटी या गावात आली होती. व-हाडी मंडळींना घेऊन येणा-या बोलेरो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व भरधाव वेगात असलेली गाडी पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. ही धडक ऐवढी भीषण होती की सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर ८ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

 

Web Title: Seven killed in Yavatmal accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.