मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघातात सात ठार
By Admin | Updated: December 1, 2014 10:55 IST2014-12-01T08:53:54+5:302014-12-01T10:55:43+5:30
अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅनने ट्रकला धडक दिल्याने सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघातात सात ठार
ऑनलाइन लोकमत
मुर्तिजापूर, दि. १ - अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅनने ट्रकला धडक दिल्याने सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत प्रवासी अकोल्यातील रहिवासी असून हे सर्व जण पासपोर्ट आणण्यासाठी नागपूरला जात होते.
मुर्तिजापूरजवळील कुरुम आणि माना दरम्यान नवसारजवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मारुती व्हॅनने ट्रकला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की मारुती व्हॅन सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला व तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर अमरावतीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहेत.