सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 12, 2017 03:33 IST2017-05-12T03:33:18+5:302017-05-12T03:33:18+5:30

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कृषी आयुक्त; पुणे विकास देशमुख यांची बदली यशदा पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली.

Seven IAS officers transfers | सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कृषी आयुक्त; पुणे विकास देशमुख यांची बदली यशदा पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली. एस.एम.केंद्रेकर हे राज्याचे नवे कृषी आयुक्त असतील. व्ही.एन.कळम पाटील यांची बदली चित्रपट महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी तर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव म्हणून मंत्रालयात केली आहे. अमित सैनी हे विक्रीकरण विभागात सहआयुक्त असतील. शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव कमलाकर फंड यांची बदली एकात्मिक बाल विकास योजना; नवी मुंबईच्या आयुक्तपदी झाली. ठाण्यातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली.

Web Title: Seven IAS officers transfers