तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प!
By Admin | Updated: September 25, 2014 01:31 IST2014-09-25T01:31:25+5:302014-09-25T01:31:25+5:30
३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.

तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प!
ग्राहकांची गैरसोय : व्यवसायावर परिणाम होणार
नागपूर : ३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत बँकांचे कामकाज एवढे दिवस ठप्प राहण्याची पहिलीच वेळ आहे.
३० सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरला बँकांचे अर्धवार्षिक क्लोजिंग असल्याने या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. २ आॅक्टोबरला गांधीजयंती आहे. त्या दिवशी बँकांना सुटी असल्याने व्यवहार होणार नाहीत. ३ आॅक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहतील. ४ रोजी शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्धा दिवसच राहील. याशिवाय ५ रोजी रविवार आणि सोमवार, ६ आॅक्टोबरला बकरी ईदनिमित्त पुन्हा बँकांना सुटी असल्याने कामकाज होणार नाही. तसे पाहता बकरी ईद रविवारीच आहे. पण बँकांनी ही सुटी सोमवारी जाहीर केली आहे.
यानंतर प्रलंबित राहिलेल्या कामासाठी आणखी दोन दिवस लागतील.
उपरोक्त सर्व दिवसांची गोळाबेरीज केल्यास ३० सप्टेंबर ते ७-८ आॅक्टोबरपर्यंत बँकांचे कामकाज होणार नाही. (प्रतिनिधी)