पिंजाळवरील सात बंधारे पडले कोरडेठाक

By Admin | Updated: June 10, 2016 03:31 IST2016-06-10T03:31:04+5:302016-06-10T03:31:04+5:30

स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

The seven dams on the pinnacle have collapsed | पिंजाळवरील सात बंधारे पडले कोरडेठाक

पिंजाळवरील सात बंधारे पडले कोरडेठाक


वाडा: प्रशासनाच्या हलगर्जीने तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आज पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार महिने मुसळधार पाऊस पडून ही ह्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे फेब्रुवारी नंतर जिल्ह्यातील बहुतेक नद्या कोरड्या पडतात. आणि त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना वर्षानुवर्ष बसत आहे.
मुंबईच्या २०१६ पर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पिंजाळ प्रकल्प ज्या नदीवर बांधला जाणार आहे ती पिंजाळ नदी आज बहुतेक ठिकाणी कोरडी पडली आहे. ज्या ठिकाणी नैसगिकरित्या खोल भाग (डोह) ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी फक्त पाण्याचे साठे राहिले आहेत. तर ह्या नदीवर असलेले ७ बंधारे हे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्याचा फटका वाडा व विक्रमगड तालुक्यातील गावे व पाड्यांना बसत आहे. युवास्पर्श या सामाजिक संस्थेने पिंजाळ नदीची पाहणी करून ह्या नदीवरील बंधाऱ्यांचा सर्वे केला असता या नदीवर आलमान (पिंगेमान),पाली, काशिवली, सापने, करंजा, वाकी ह ेबंधारे पाणलोट विभागाकडून एकदम निकृष्ट बांधले गेल्यामुळे ेह्या बंधाऱ्यांमध्य ेथोडेही पाणी शिल्लक नाही.तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम एकदम जीर्ण झाल्यामुळे ते निकामी ठरले आहेत. तरमलवाडा तसेच सापणे बुद्रुक येथे कोल्हापुरी पद्धतीचा मोठा बंधारा बांधल्यास पाण्याची पातळी आणखी वाढून त्याचा फायदा आणखी अनेक गावांना होऊ शकेल . (वार्ताहर)
।जिल्ह्यात मोठया प्रमाणात नद्यांचे प्रमाण आहे. मात्र नियोजनाअभावी या नद्या मार्च-एप्रिल पर्यंत पूर्णपणे कोरडया पडतात. याकडे शासनाने गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. जर नियोजनबध्द बंधारे बांधले गले तर पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या होणार नाही आणि याचा लाभ शेतकऱ्यांनासुद्धा होईल.
-सचिन विलास भोईर
अध्यक्ष-युवा स्पर्श सामिजक संस्था

Web Title: The seven dams on the pinnacle have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.