जळगाव जिल्ह्यातील सात धरणे कोरडी ठाक
By Admin | Updated: February 24, 2016 02:15 IST2016-02-24T02:15:03+5:302016-02-24T02:15:03+5:30
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे

जळगाव जिल्ह्यातील सात धरणे कोरडी ठाक
जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. सध्या ५२६ गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनान नियोजन सुरू केले आहे.
सध्या गिरणा धरणात केवळ २.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणातील या जलसाठ्यावर अजून चार महिने काढायचे आहेत. या गिरणा धरणावर पाच नगरपालिका तसेच पाणी पुरवठा योजना असलेली २०८ गावे अवलंबून आहेत. या धरणामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यातील नागरिकांची तहान भागत असते. (प्रतिनिधी)
वाघूरमधील जलसाठा समाधानकारक
गिरणासह जळगाव जिल्ह्यात हतनूर व वाघूर हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या धरणात ४७.७६ टक्के पाणीसाठा आहे. जळगाव महानगरपालिका, वरणगाव, भुसावळ व रेल्वे विभाग यांचे आरक्षण असलेल्या वाघूर प्रकल्पात ६६.८९ टक्के पाणीसाठा असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना संपूर्ण उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही अशी स्थिती आहे.