गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा

By Admin | Updated: August 6, 2015 01:10 IST2015-08-06T01:10:00+5:302015-08-06T01:10:00+5:30

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित उर्फ सोनू कुडके यांच्यावर केलेल्या गोळीबारप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला

Seven accused in firing case | गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा

गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा

बीड : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित उर्फ सोनू कुडके यांच्यावर केलेल्या गोळीबारप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सातही आरोपी पसार असून त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
अंबिकानगर चौकातून मंगळवारी रात्री कुडके यांच्यावर नितीन सपकाळ याने गोळी झाडली. त्यांच्यासोबतच्या राजाभाऊ खुरणे, सचिन खुरणे, संदीप भांबे यांनाही मारहाण केली होती. मंगेश पवार यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात नितीन सपकाळ, सतीश सपकाळ, किशोर पिंगळे, बाबू भोसले व इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैयक्तिक कारणावरून प्रकरण घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. कुडके व हल्लेखोर नितीन सपकाळ हे जवळचे नातेवाईक आहेत. या वेळी वापरण्यात आलेले पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: Seven accused in firing case