टोलवर तोडगा निघेल
By Admin | Updated: March 27, 2015 01:25 IST2015-03-27T01:25:09+5:302015-03-27T01:25:09+5:30
राज्यातील सध्याचे रस्ते नीट करण्यासाठी व नवीन रस्ते तयार करण्यासाठी दीड लाख कोटींची गरज आहे. बांधकाम विभागाचे बजेट गेल्यावर्षी २७०० कोटी होते ते यावर्षी ३७०० कोटी करण्यात आले आहे.

टोलवर तोडगा निघेल
मुंबई : राज्यातील सध्याचे रस्ते नीट करण्यासाठी व नवीन रस्ते तयार करण्यासाठी दीड लाख कोटींची गरज आहे. बांधकाम विभागाचे बजेट गेल्यावर्षी २७०० कोटी होते ते यावर्षी ३७०० कोटी करण्यात आले आहे. मात्र हे देखील अपुरे आहे त्यामुळे नवीन रस्ते करण्यापेक्षा आहे ते रस्ते नीट करण्यावर भर दिला जाईल, शिवाय टोलच्या विषयावर याच अधिवेशनात सुखावणारा तोडगा काढला जाईल,असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवर बोलताना ते म्हणाले, आहे ते रस्ते चांगले करताना त्या रस्त्यांवर एकदा खर्च केल्यानंतर पुन्हा पुन्हा तो करण्याची वेळ येऊ नये याकडे लक्ष दिले जाईल. काही रस्ते अन्यूटी पध्दतीने तर काही डिफर पेमेंटच्या माध्यमातून केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत, प्रमोशन्स झालेली नाहीत. सगळी प्रमोशन्स एक महिन्याच्या आत पूर्ण केली जातील आणि रिक्त जागा भरण्याचे कामही गतीने पूर्ण केले जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.