भगवानगडावर बंदोबस्त
By Admin | Updated: October 19, 2015 02:55 IST2015-10-19T02:55:45+5:302015-10-19T02:55:45+5:30
पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची पोलीस दलाकडून तयारी सुरू झाली आहे.

भगवानगडावर बंदोबस्त
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची पोलीस दलाकडून तयारी सुरू झाली आहे. गतवर्षी झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर गडावरील कायदा-सुव्यवस्था चोख राहण्यासाठी यंदा गडाला पोलिसांचा पहारा राहणार आहे.
भाजपाचे नेते, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गतवर्षी झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात वादाच्या ठिणग्या पडल्या होत्या. मुंडे यांच्यातील भाऊबंदकी उफाळून आली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी गडावरही वडिलांची जागा घेतली. धनंजय मुंडे यांनी गडावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती.